जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात १६ जुलै २०२६ पूज्य चालीहा साहेब उत्सवास होणार प्रारंभ.

पाचोरा-

सिंधी समाजाच्या श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक असलेला पूज्य चालीहा साहेब हा ४० दिवसांचा पवित्र व्रत-उत्सव दि. १६ जुलै २०२६ पासून प्रारंभ होत आहे. सिंधी समाजाचे इष्टदेव तथा वरुणदेव अवतार भगवान श्री झूलेलाल यांच्या पूजन, आराधना व आशीर्वादाने या पवित्र व्रताची सुरुवात केली जाते. हे पूजन सिंधी काॅलोनी येथील श्री झूलेलाल मंदिर व माॅ का दरबार येथे केली जाते.या कालावधीत सिंधी समाजासह इतर समाजातील भाविकही श्रद्धेने व्रत, उपवास, पूजा-अर्चना व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. सिंधी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक व आध्यात्मिक परंपरेशी चालीहा साहेब उत्सवाचे अतूट नाते असून, ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे जपली जात आहे.दरवर्षी सिंधी समाजातील श्रद्धाळूंचा पूज्य सिंधी जनरल पंचायत व चालिया ग्रुप हे संयुक्त रित्या अत्यंत भक्तिभावाने पूज्य चालिया साहेब महोत्सवाचे नियोजन, व्यवस्थापन व विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी पार पाडतो. या पवित्र कालावधीत श्री वसणघोट दरबार, उल्हासनगर येथील पूज्य साई ओमीरामजी, पूज्य साई काली साईजी तसेच चाकरभाटा (छत्तीसगड) येथील पूज्य साई लालदासजी महाराज व सिंधी समाजाचे महान संत यांच्या पावन उपस्थितीत सत्संग, भजन-कीर्तन व आध्यात्मिक प्रवचने आयोजित केली जातात. याशिवाय सिंधी संस्कृती, परंपरा आणि सिंधी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने चालिया ग्रुपतर्फे लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा, धार्मिक उपक्रम आणि कला सादरीकरणांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये सिंधी संस्कृतीबद्दल अभिमान, श्रद्धा आणि आपुलकी निर्माण होण्यास मोठी प्रेरणा मिळते.पूज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने दरवर्षी या पवित्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेवटच्या दिवशी भव्य अशी ज्यात पूज्य भैहराणा साहिब मिरवणूक काढली जाते व महाआरती होऊन यावर्षीही सर्व धार्मिक कार्यक्रम श्री झूलेलाल मंदिर, सिंधी कॉलनी, पाचोरा येथे संपन्न होणार आहेत.सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान श्री झूलेलाल यांचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पूज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!