मुंबईत गणेशोत्सव विसर्जन काळात होणार नाही रेल्वे मेगाब्लॉक -मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे ट्विट.
मुंबई –
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आगामी गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार जय्यत तयारी करण्यात येत आहे. मुंबईत तर गणेश उत्सवाचा आगळा वेगळाच आनंद बघावयास मिळतो. या काळात रेल्वेचे मेगाब्लॉकमुळे गणेशभक्तांची मोठी गैरसोय होते. यंदा हा प्रकार टाळण्यासाठी सरकारने पाऊल उचललं आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही माहिती दिली. गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ‘गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून गणेश विसर्जनापर्यंत मुंबई मधील रेल्वे मेगाब्लॉक रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवानी जी यांच्याशी बोलणे झाले. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही केलेली विनंती त्यांनी मान्य केली असून, गणेशोत्सवादरम्यान मुंबई रेल्वेत कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.’, असं ट्विट लोढा यांनी केलं आहे.