पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात धो-धो पावसाला होणार सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून राज्यासहित संपूर्ण देशभरात वाढत्या उष्णतेमुळे जनता हैराण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेचे मान्सून कडे लक्ष लागले आहे. मान्सूनचे आगमन कधी होणार ? हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याच संदर्भात भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे येत्या काही तासात केरळमध्ये आगमन होणार आहे. यानंतर मान्सून आपल्या महाराष्ट्रात पोहोचणार आहे.
सरासरी 10 जूनच्या सुमारास मान्सून कोकणासहित मुंबईत दाखल होणार असा अंदाज आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी देखील या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 1जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. मात्र हा मोसमी पाऊस राहणार नाही. हा पाऊस पूर्व मौसमी राहणार आहे.
1 जून पासून सुरू होणारा हा पूर्व मोसमी पाऊस 5 जून पर्यंत सुरू राहणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसानंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असा अंदाज पंजाबराव डंख यांनी वर्तवला आहे.
8 जूनच्या सुमारास मान्सून सक्रिय होणार असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, 6 जून ते 9 जून या कालावधीत विदर्भात देखील मोठ्या पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे यावर्षी जुलै महिन्यात मोठा पाऊस पडणार आहे.
ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे. यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस होणार अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांनी पुन्हा एकदा धो-धो पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच मान्सूनचे देखील लवकरच आगमन होणार आहे. येत्या आठ-नऊ दिवसांनी अर्थातच 8 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या शेतीची पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला तज्ञांच्या माध्यमातून दिला जात आहे.