Blog

अमोल महाजन यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर


उत्राण ता.एरंडोल येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल गोविंदा महाजन यांचे सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विविध योजना आपल्या सि.एस.सी. सेंटर च्या माध्यमातून जसे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पॉक्रा तसेच महाडीबिटी च्या ठीबक सिंचन, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी सन्मान योजना, एम.आर. इ.जी.पी.एस., एस.बी.एम योजना व इतर राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तळागळातील सामान्य शेतकर्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करून सदर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदान मिळवून देण्याचे प्रभावी पणे उल्लेखनीय कार्याची दखल घेवून जळगाव येथील राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक 17 सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!