द ट्रॕप “मराठी चित्रपटात शितल ढेकळे
पुणे-
चित्रपट निर्माता सुजित जाधव यांचे ‘मस्त पुणेकर प्रोडक्शन’ निर्मित “द ट्रॕप “या मराठी चित्रपटात सिने अभिनेत्री शितल ढेकळे झळकणार असुन लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”द ट्रॕप “हा मराठी चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असुन या चित्रपटात प्रामुख्याने प्रसिध्द अभिनेते मोहन जोशी,’राणा दा’म्हणजेच आवडता अभिनेता हार्दिक जोशी ,सुजित जाधव,संजय खापरे ,अभिनेत्री शितल ढेकळे स्वाती लिमये,प्रीती पांढरे यांच्या भुमिका आहेत.
तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल खापरे हे करीत आहेत.सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे विभागातील उरुळी कांचन भागातील डाळींब या गावात उद्योजक संदीप गव्हाणे यांच्या जानाई रिसाॕर्ट व परिसरात आहे प्रसिध्द मुक्त पत्रकार व निवेदक आत्माराम ढेकळे यांची मुलगी सिने अभिनेत्री शितल ढेकळे असुन विविध चित्रपटात तिने काम केले आहे.तसेच या क्षेत्रात ती उत्कृष्ट निवेदिका देखील आहे.तसेच सामाजिक ,सांस्कृतिक ,शैक्षणिक क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सेलिब्रेटी म्हणुन विविध कार्यक्रमात शितल ढेकळे ला निमंत्रण असते.या कार्यामुळे या क्षेत्रात तिचा परिचय संपर्क देखील दांडगा आहे.या चित्रपटात प्रमुख भुमिकेत संधी मिळाली बद्दल अनेकांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.