
मुंबई-
नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई येथील मुख्याध्यापक दिपक नामदेव बडगुजर यांनी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यासाठी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल फाउंडेशन द्वारा आयोजित कोल्हापूर येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार 2025 सिने अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर , प्रसिद्ध कवी रोहित शिंगे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि दीपक चामे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील शिक्षक उपस्थित होते .
नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे आयोजित सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे पहिले शिक्षक मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांना देण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे ,शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे , शिक्षणाधिकारी अरुणा यादव ,शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बालघरे, शिक्षण विस्तार अधिकारी माधुरी नारखेडे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक , मुख्याध्यापक यांनी दिपक बडगुजर यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.





