क्राईमजळगाव जिल्हा

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करत;3 मोटार सायकली केल्या जप्त


चाळीसगाव-

दिनांक-16/06/2024 रोजी फिर्यादी नामे- नानासाहेब सुदाम आहेर रा. जळगाव खु॥ ता. नांदगाव जि. नाशिक यांची 70,000/- रु. किं.ची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटीना मोटर सायकल क्रं. MH-41 BG-6941 ही घाट रोड विठ्ठल सभा मंगल कार्यालयजवळुन चोरीस गेलेबाबत फिर्याद दिल्याने त्यांचे फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 261/2024 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस निरीक्षक, श्री. संदिप पाटील सो. यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन रवाना केले होते. सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा व अज्ञात आरोपीतांचा चाळीसगाव शहरातील घाट रोड बायपास परीसरात शोध घेतला असता ते मिळुन आल्याने आरोपी नामे- 1) सुनिल रघुनाथ मेंघाळ वय 22 वर्षे, 2) तुळशिराम मच्छिंद्र जाधव वय 19 वर्षे, 3) कचरु शिवा मेंघाळ वय – 19 वर्षे, व 4) विधि संघर्षग्रस्त बालक नामे- बाळु चिमा मधे वय – 17 वर्षे, 11 महिने सर्व रा. कोळवाडी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व इतर दोन मोटार सायकली असे एकुण 1,70,000/- रुपये किंमतीच्या एकुण 3 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई ही मा. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव, मा. अभयसिंह देशमुख सो. सहा. पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्री. संदिप पाटील सो. यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोउपनिरी/ सुहास आव्हाड, पोहेकॉ/1720 राहुल सोनवणे, पोना/2800 भुषण पाटील, पोना/3136 महेंद्र पाटील, पोकॉ/1419 विजय पाटील, पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ/208 आशुतोष सोनवणे, पोक / 2545 रविंद्र बच्छे, पोकॉ/ 447 समाधान पाटील, पोकॉ/3363 पवन पाटील, पोकॉ/988 ज्ञानेश्वर गिते, पोकॉ/ 1808 मनोज चव्हाण, पोक/2400 राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1720 राहुल सोनवणे व पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!