नगरपरिषद,ग्रामीण रुग्णालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप डेंग्यूताप संदर्भात जनजागृती
पाचोरा-
पावसाळा आला म्हणजे ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचून डासांची उत्पत्ती होवून, डेंग्यू ताप होतो, डेंग्यू ताप येवुन नागरीकांची तब्बेत बिघडू नये म्हणून.पाचोरा नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरातील भागात डेंग्यू सर्व्हेक्षण हिवताप सर्व्हेक्षण करत हस्तप्रतिका वाटप करत जनजागृती मोहिम राबवत डेंग्यू ताप कश्यामुळे होतो,त्या पासुन आपला बचाव कसा करता येईल या संबंधीत जनजागृती केली.
यावेळी मलेरीया विभाग कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज देशमुख उपस्थित होते.
डेंग्यु तापचा प्रसार कसा होतो ?
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यु विषाणू एडीस इजिप्तरी जातीच्या डासांच्या मादीमार्फत चाव्याद्वारे दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस अजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या पायांवर पांढरे चट्टे असतात. आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिमि असतो, हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो. आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.
डेंग्यु तापाची लक्षणे.
१) एकदम जोरात ताप चढणे. २) डोक्याच्या पुढचा भाग अतिशय दुखणे. ३) डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांना हालचाली सोबत अधिक जाणवते. ४) स्नायु आणि सांध्यामध्ये वेदना होणे. ५) चव आणि भुक नष्ट होणे.
डेंग्यु रक्तस्त्रावात्मक तापची लक्षणे.
१) डेंग्यु तापाप्रमाणेच लक्षणे. २) तीव्र सतत पोट दुखी. ३) त्वचा फिकट,थंड किंवा चिकट होणे. ४) नाक, तोंड हिरड्यातुन रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे. ५) रक्तासह किंवा रक्ताविणा वारंवार उलट्या होणे. ६) जास्त झोप येणे आणि अस्वस्थता वाटणे. ७) रुग्णाला तहाण लागणे आणि तोंड कोरडे पडणे. ८) श्वास घेण्यास त्रास होणे.
डेंग्यु तापाची लक्षणे आढळल्यास काय कराल ?
ताप कमी करण्यासाठी पॅरासिटॉमल गोळ्या घ्याव्यात. ताप असे पर्यंत आराम करावा. तापासाठी किंवा वेदनात्मक अस्पिरिन किंवा आयबुप्रेफेन गोळ्या घेवू नये म्हणून जलपेयाचा भरपुर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी) रक्तस्त्राव व शॉकची लक्षणे ओढळल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. घराचा परिसर स्वच्छ ठेवणे,
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण हे करायला हवं.
घरातील पाण्याचे साठे (हौद, सिमेंटच्या टाक्या, कुलर, शोभवंत फुलदाण्या इत्यादी) आठ दिवसातून एक वेळा रिकामे करुन घासुन पुसून सुकऊन स्वच्छ करून नंतर पाण्याने भरणे. आठवड्याचा एक दिवस कोरडा पाळणे. झोपतांना किटकनाशक मारीत मच्छरदाणीचा वापर करणे,
आठवड्याचा एक दिवस कोरडा पाहणे. झोपतांना किटकनाशक मारीत मच्छरदाणीचा वापर करणे.
घराच्या परिसरात किंवा गच्चीवर / धाब्यावर रिकामे पडलेली पञ्चांचीं डबे, नारळाच्या करवंट्या, टायर, फुटकी रांजण माठ यांची आरोग्यदायी विल्हेवाट लावणे. घरांच्या खिडक्या व दरवाज्यांना बारीक जाळी बसवावी.
घराच्या / गावाच्या परिसरात डासोत्पत्ती स्थाने असल्यास त्यामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावीत.
(गप्पी मासे पाळा हिवताप व डेंग्यूताप टाळा)
घरातील गळत असलेले नळ, टाकी हे सर्व ताबडतोब दुरुस्त करुन पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
साचलेल्या डबक्यात रॉकेल / वेस्टेज ऑईलची फवारणी करा. संडासाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवा.
वरील प्रमाणे सावधगिरी बाळगावी.