जळगाव जिल्हा

कर्ज प्रकरणासाठी जळगावला जावून येतो असे पत्नीस सांगून पती बेपत्ता.

पाचोरा-

पाचोरा येथील रहिवासी जितेंद्र भानुदास शिंदे यांनी पत्नीला जळगाव येथे कर्ज प्रकरणी जावून येतो, असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे, जितेंद्र शिंदें यांचा नातेवाईक, मित्रांकडे शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
या बाबत त्यांच्या पत्नीने पाचोरा पोलीस स्टेशन गाठून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की,मी आरती जितेंद्र शिंदे वय 35 धंदा घरकाम रा. राजिव गांधी कॉलणी पाचोरा येथे पती जितेंद्र भानुदास शिंदे वय 41,मोठी मुलगी मोहिनी शिंदे, अश्विनी शिंदे, कल्याणी शिंदे, यांच्या सह राहते व माझे पती कटलेरीचा धंदा करुन त्यावर परिवाराचा उदरनिरनिर्वाह करतात.
काल दिनांक 07/06/2025 रोजी सकाळी 09:30 वाजेचे सुमारास मी घरी असतांना माझे पती जितेंद्र भानुदास शिंदे हे मला सांगुन गेले की, मी जळगाव येथे कर्ज प्रकरणाच्या कामासाठी जात आहे. असे सांगुन राहते घरातुन जाण्याआगोदर त्यांना कोणाचेतरी पैसे संदर्भात फोन येते होते. त्यानंतर सकाळी 11.00 वाजेचे सुमारास मी पती जितेंद्र शिंदे यांना जळगाव येथे पोहचले की, नाही बाबत त्यांना कॉल केला असता त्यांचा मोबाईल स्विचआँफ होता. त्यानंतर मी त्यांना आता पावेतो बरेच कॉल केले परंतु त्यांचा मोबाईल आता पावेतो बंद आहे. म्हणुन माझी खात्री झाली की, माझे पती जितेंद्र शिंदे हे  जळगाव येथे कर्ज प्रकरणासाठी जावुन येतो असे सांगुन राहते घरातुन कुठेतरी निघुन गेले आहेत, त्यांचे वर्णन, उंची 5 फुट 5 इंच, रंग-गोरा चेहारा गोल, अंगात ब्लु रंगाचे चेक्सचे शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट, बोली भाषा मराठी सोबत Vivo कंपनीचा मोबाईल त्यात एअरटेल कंपनीचे सिम  कार्ड आहे. अशी तक्रार पाचोरा पोलीसात दिली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ तुषार विसपुते हे करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!