IAS पुजा खेडकरांनी असं वागायला नको होतं-खासदार निलेश लंके
अ.नगर-
अधिकारी नवीन असो वा जुना, त्याचं वर्तन चांगलंच पाहिजे, पुजा खेडकरांनी असं वागायला नको होतं अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. पूजा खेडकरांच्या वर्तनाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पूजा खेडकर या निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या असून दिलीप खेडकरांनी निलेश लंके यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.
प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. याबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले की, नवीन अधिकाऱ्यांची अशी वागणूक बरी नाही, त्यांनी असं वागायला नको होतं. त्यांच्या वडिलांची देखील सर्व्हिस झाली आहे. जुना असो की नवा अधिकारी असो, त्यांची वर्तवणुक चांगली असावी. अन्यथा वरिष्ठ पातळीवर याची दखल घ्यायला हवी.