जळगाव जिल्हा

श्रीकांत धिवरे यांची जळगाव पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती, डॉ.महेश्वर रेड्डी यांची बदली..

जळगाव-

दिनांक २० एप्रिल रोजी राज्य सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या होत्या. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची कारकीर्द विशेष ठरली.दरम्यान, त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावच्या नव्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धिवरे हे अनुभवी अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

१. निखिल पिंगळे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, सातारा.
२. राजकुमार शिंदे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, वाशीम.
३. महेश्वर रेड्डी : पोलिस अधीक्षक, जळगाव ते पोलिस अधीक्षक, सीआयडी पुणे.
४. तुषार दोशी : पोलिस अधीक्षक, सातारा ते पोलिस अधीक्षक, सांगली.
५. संदीप घुगे : पोलिस अधीक्षक, सांगली ते पोलिस उपायुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
६. योगेश गुप्ता : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.
७. नीलोत्पल : पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, कोल्हापूर
८. एम. रमेश : अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, गडचिरोली.
९. श्रीकांत धिवरे : पोलिस अधीक्षक, धुळे ते पोलिस अधीक्षक, जळगाव..

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!