जळगाव जिल्हा

जवान समाधान महाजन यांचेवर शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

Pachora|ई-पॉश मशिनचे वारंवार सर्व्हर डाऊन स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदार यांना निवेदन

भडगाव-

सुट्टी भोगुन पुन्हा सेवेत रुजु होण्यासाठी जात असतांना तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन वय २३ वर्ष याचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली होती. वाडे येथे दिनांक २६ जुलै शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जवानाचे पार्थीव पोहताच सजविलेल्या वाहनावरुन गावातुन डीजेच्या तालावर वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नागरीक, महिला, तरुण मंडळी, आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते.  जवानावर वाडे येथे दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी शहिद जवानाला त्यांचा पुतण्या प्रसाद रामकृष्ण माळी वय ५ वर्ष हा चिमुकल्या बालकाच्या हस्ते अग्नीडाग देण्यात आला. अंत्ययाञेस नागरीक, महिला , तरुण मंडळी, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आजी, माजी सैनिक संघटना पदाधिकारी आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. भारत मातेच्या घोषणांनी संपुर्ण परीसर दुमदुमला होता.

याबाबत माहिती अशी कि, समाधान सखाराम महाजन वय २३ वर्ष हे ४० आर जे एन के पुंछ येथे आर्मीमध्ये पोष्टींगर कार्यरत होते. ते वाडे येथे एका महिन्याच्या सुटीवर घरी आलेले होते. सुट्टी उपभोगुन कर्तव्यावर हजर होणेकामी परतीचा प्रवास करत असतांना मालपुर, आग्राजवळ रेल्वे अपघातात दि.२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या त्यांचा मृत्यु झाला होता. या जवानाचे पार्थीव दि. २५ रोजी गुरुवारी दिल्लीहुन औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आले होते. तर आज सकाळी औरंगाबादहुन वाडे येथे जवानाचे पार्थीव साडेअकरा वाजेच्या सुमारास आणण्यात आले. जवानाच्या घरी पार्थीव आणल्यानंतर जवानाच्या आई, वडील, पत्नी, काका, काकु यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला. यावेळी पोलीस व नाशिक आर्मी गार्ड यांनीही जवानास सलामी दिली. तेथुन सजविलेल्या वाहनावरुन या शहिद जवानाची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. गावात शहिद जवानाचे डीजीटल बॅनर झळकत होते. गावात व स्टँड परीसरात रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

मिरवणुकीत तीनशे मिटरचा तिंरगा आकर्षण  तिरंगा विद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी हातात धरुन मिरवणुक निघाली. डीजेवर देशभक्ती गितांनी परीसर दुमदुमला होता.  त्यानंतर गावालगत प्लाॅट भागात या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी नाशिक आर्मी गार्ड, पोलीस गार्ड आदिंनी जवानाला मानवंदना दिली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिंदे शिवसेना भडगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक राजेंद्र परदेशी, जालींदर चित्ते वाडे, शिवसेना भिमसेना तालुकाप्रमुख शैलेश मोरे, दक्षता व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, मच्छिंद्र शार्दुल, समाधान पाटील फौजी कोठली, भाजपाचे पाचोरा अध्यक्ष अमोल पाटील, भडगाव भाजपाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, उपाध्यक्ष रतिलाल पाटील, विकास पाटील बांबरुड, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, दक्षता महिला विभागाच्या अध्यक्षा योजना पाटील, विधानसभा क्षेञ प्रमुख जे. के. पाटील, भडगावचे नगराध्यक्ष गणेश परदेशी, तालुका उपाध्यक्ष रतन परदेशी, गोंडगावचे व्याख्याते दत्तु मांडोळे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष डाॅ. संजीव पाटील,परदेशी, राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, पीटीसी चेअरमन संजय वाघ, विकी पाटील, शरद पाटील, बाजार समिती संचालक डाॅ. निळकंठ पाटील, गोंडगाव सरपंच राहुल पाटील, प्रा. गुणवंतराव अहिरराव, कजगाव सरपंच रघुनाथ महाजन, माजी सरपंच ललीत धाडीवाल, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी तसेच भडगाव निवाशी नायब तहसिलदार सुधिर सोनवणे, लिपीक एम एम कोळी, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील व भडगाव पोलीस स्टेशनचे ३० पोलीस कर्मचारी, जळगाव मुख्यालयाचे सलामी गार्ड ९ कर्मचारी, भडगाव गटविकास अधिकारी अन्सार शेख, दिलीप चिंचोरे, जळगाव सैनिक बोर्डाचे सुभेदार नितीन पाटील, देविदास पाटील, प्रमोद पाटील अशी भडगावची टीम, चाळीसगाव जयहिंद सैनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. ए. पाटील, सचीव आबासाहेब पाटील, उपाध्यक्ष संभाजी पाटील वाडे, स्टेशन इड काॅर्टर भुसावळ, जीओसी टीम महाराष्टृ, गुजरात, गोवा एरीया टीम, आबासाहेब गरुड सैनिक चाळीसगाव, ञिदल सैनिक संघटनेचे महाराष्टृ आजी माजी सैनिा परीवार चाळीसगाव, आबासाहेब गरुड सैनिक चाळीसगाव, नाशिकचे पोलीस निरीक्षक व वाडे येथील रहिवाशी नंदराज पाटील, गोंडगाव सैनिक किशोर पाटील, वाडे तलाठी ज्ञानेश्वर काळे, पोलीस पाटील भुषण पाटील, वाडे गावातील आजी माजी सैनिकही मोठया संख्येने हजर होते.या वेळी वाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विकासोचे पदाधिकारी, वाचनालयाचे पदाधिकारी, दुध उत्पादक संस्थेचे पदाधिकारी, जय प्रकाश फ्रुटसेल सोसायटी, शितल मजुर सोसायटीचे पदाधिकारी, विद्यालयाचे शिक्षक, नातेवाईक मंडळी, ग्रामस्थ, महीला, तरुण मंडळी, आजी, माजी सैनिक मोठया संख्येने सहभागी होते.तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!