जळगाव जिल्हा

नगरदेवळा येथे स्व.आर.ओ. तात्यांच्या स्मरणार्थ वैशालीताईंनी उभारला प्रवासी निवारा

पाचोरा-

दिनांक २७जुलै शनिवार रोजी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळच्या बस स्थानकावर प्रवाशांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन वैशालीताई सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने स्व.आर.ओ. तात्यासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवासी निवारा उभारण्यात आला असून आज याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस स्थानकाजवळून परिसरातील अनेक गावांना प्रवासी जात असतात. येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असतांना देखील प्रवासी निवारा नसल्याने परिसरातील जनतेची कुचंबणा होत होती. ही व्यथा समजताच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी स्वखर्चाने दिवंगत माजी आमदार आर. ओ. तात्यासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवासी निवार्‍याची उभारणी केली. यासोबत रात्री-अपरात्री प्रवास करणार्‍यांना सुविधा मिळावी म्हणून त्यांनी सौर उर्जेवर चालणारे दोन हायमास्ट लँप देखील या परिसरात लावले.

आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळचा प्रवासी निवारा आणि दोन हायमास्ट लँप यांचे वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रवासी निवार्‍याचा परिसरातील जनतेला लाभ होणार असल्याने लोकांनी या कामाबाबत ताईंचे कौतुक केले आहे.

दरम्यान, आजच्या लोकार्पण कार्यक्रमाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवासेना आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!