जळगाव जिल्हा
एरंडोल तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदार यांना दिले निवेदन..
कासोदा ता. एरंडोल
स्वस्त धान्य वाटप करता वेळी वारंवार ई-पॉश मशिनचे सर्व्हर डाऊन होते लाभार्थ्यांच्या स्वस्त धान्य दुकानातून परत घरी जावे लागते, लाभार्थ्यांच्या रोषाला दुकानदारास सामोरे जावे लागत आहे.
वारंवार ई-पॉश मशिनचे सर्व्हर डाऊन असल्याने एरंडोल तहसील कार्यालयात एरंडोल तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत तहसीलदार सौ. सुचिता चव्हाण यांना ई-पॉस मशीन बाबतीत व स्वस्त धान्य दुकानदारांच्या इतर मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. तसेच ई-पॉश मशीन तहसील कार्यालयात जमा करत, तहसीलदार सौ.सुचिता चव्हाण यांना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष पुणेश जी मंत्री तात्या ठाकूर राजूभाऊ वंजारी बाबुलाल माळी संजय पाटील बाबूलाल मराठे गणेश पिंगळे जिया उद्दीन शेख राजू मानधने व सर्व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.