क्राईमराज्य

नगर जिल्ह्यात दुध भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू…

Mumbai |अंबरनाथ मधील तरुणीची फसवणूक, फायनान्सच्या 6 मोटरसायकली तिच्या नावावर, मुंबई बाबा धावले मदतीला,

अहमदनगर-

नगर दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सुमारे 11 दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई केली. त्यात काही केंद्रावरील तपासणीसाठी दुधाचे नमुने घेण्यात आले. काही ठिकाणी भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

28 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील जगदंबा दूध संकलन केंद्र, जगदंबा माता दूध संकलन केंद्र येथील गायीच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर शिलेगावातील पतंजली दूध संकलन केंद्राची पथकाने पाहणी केली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.बी. पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. पालवे व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली.

1 ऑगस्ट रोजी कोपरगावातील साई अमृत दूध संकलन केंद्र, धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र, जवळके येथील प्रशांत भागवत शिंदे यांच्या गोठ्यात कारवाई करण्यात आली. या सर्व ठिकाणचे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी बडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली. 4 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र येथील दुधाचे नमुने घेण्यात आला तसेच 1200 लीटर दुध नष्ट करण्यात आले. तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भगवान कृपा दुध संकलन केंद्रात दुधाचे नमुने घेण्यात येऊन 3800 लीटर दुध नष्ट करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र, जगदंबा दुध संकलन व शितकरण केंद्र, दूरगाव येथील साईबाबा दुध शितकरण केंद्र, अन्वेषा दुध संकलन केंद्र, मिरजगावातील गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टस, कुळधरण येथील त्रिमूर्ती दुध संकलन केंद्र, कर्जत येथील सदगुरू मिल्क व प्रोडक्टस, बहिरोबावाडीतील नागराबाई यादव दुध संकलन केंद्र, मिरजगाव येथील अ‍ॅग्रोवन मिल्क प्रोडक्टस येथील दुधाचे नमूने घेण्यात येवून दूध नष्ट करण्यात आले.गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टसचे 4200 लीटर दूध नष्ट करण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!