अमोल शिंदेंना धक्का,जनता वसाहत भागातील
महिला भगिनींचा सुनिता ताई पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश..
पाचोरा-
पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील अनेक महिलांनी आज भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांना धक्का देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या स्थानिक नगरसेवक व वर्षानुवर्षे आमचे जिवावर राज्य करणाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला विकास कामांपासून वंचित ठेवले मात्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कोणताही आकस मनात न बाळगता आमच्या भागाचा सर्वतोपरी विकास करण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळेच आम्ही आज याची जाणीव झाल्याने शिवसेनेत जाहीरित्या प्रवेश करत असून आगामी काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी काम करू असा विश्वास यावेळी अनेक महिला भगिनींनी व्यक्त केला.
स्थानिक नगरसेवकाच्या नाकर्तेपणामुळे वार्ड व गल्लीतील नालेसफाई, पाणी, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधा देखील आम्हाला अनेक वर्षांपासून मिळालेल्या नाहीत.त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत असा खेद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांनी या महिलांना आगामी काळात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन पक्षात स्वागत केले. आपण सर्वजण एक दिलाने एका झेंड्याखाली या निश्चितपणे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.यावेळी सुषमा पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.मंचावर महिला आघाडीच्या शहर प्रमुख मंदाकिनी पारोचे,पद्माताई पाटील,बेबाताई पाटील प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रवीण ब्राह्मणे यांनी स्थानिक समस्याची जाणीव करून देत दरम्यानच्या काळात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मदतीने केलेल्या विकास कामांची माहितीदिली तसेच अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन सर्व महिला भगिनींना आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेनेच्या वतीने सहकार्याचे आश्वासन दिले.यावेळी अनिता जाधव,कल्पनागव्हाणे,शोभाबाई सुलाबाई देवरे,अश्विनी देवरे,उषाबाई मंडल,सविता जाधव,मुक्ताताई देवरे,आशा संसारे,वंदना माने,मिनाबाई मंडल,शोभा शिरसाठ,अनिता तायडे,अरुणा दासर,भाग्यश्री माने,सोनल मोरे यांचे सह अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.