जळगाव जिल्हा
अनुगामी लोकराज्य महा अभियान संस्था उपविभाग जळगाव,व वृंदावन फाऊंडेशन पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा..
पाचोरा-
पाचोरा येथे थेट अयोध्येतुन प्रभू श्रीराम मंदिरातून आलेल्या श्रीराम कोदंडधारी पंचधातु मूर्ती प्रदान सोहळा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शन डॉ. श्री निळकंठ पाटील, (वृंदावन फाउंडेशन पाचोरा )यांनी समस्त श्री राम भक्तांना अयोध्या श्रीराम जन्मभूमी, 500 वर्षांचा संघर्ष व भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन केलें. सुरुवातीला डॉ.दिनेश सोनार गजानन हॉस्पिटल संचालक, आबा येवले पत्रकार सौं. वैशाली जडे यांना वृंदावन फाउंडेशन ट्रॉफी देण्यात आली. त्यानंतर श्रीराम मूर्तीचे वाटप करण्यात आले. डॉ. दिलीप पाटील, योगेश सोनार, योगेशजी जडे, राजूभाऊ बाळदकर, अमितजी शर्मा, श्यामजी सराफ, गंगाराम तेली, विनोद पाटील, अँड निलेश पाटील, श्रीकृष्ण अर्जुन थोरात, किशोर संचेती, दिनेश गायकवाड ह्या सोहळ्यात मित्र परीवारासह उपस्थित होते.