जळगाव जिल्हा

लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ तर्फे महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार सन्मान.


पाचोरा-

पाचोरा येथील लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ तर्फे गेल्या पाच वर्षापासून समाजातील महिला करता विविध उपक्रम व स्पर्धा कार्यक्रम घेतले जातात यामध्ये उखाणे,संगीत,खुर्ची,नाटिका तसेच विविध स्पर्धा घेण्यात येतात या मंडळातर्फे समाजातील महिलांना कार्यक्रमानिमित्त एकत्रित आणून त्यांचा उत्साह वाढवण्यात येतो तसेच कार्यक्रमात समाजातील महिला भाग घेऊन आपल्यातील असलेले गुण संपन्न करीत असतात समाजातील सर्व महिलांना एकत्रित आणण्याकरता समाज मंडळ हे कार्य तत्पर असतात समाजातील महिलांना घराबाहेर येऊन कार्यक्रमात भाग घेऊन त्यांना आपल्या व्यथा-कथा मांडता येतात आपले मन मोकळे करण्यास संधी मिळते त्यामुळे उन्नती महिला मंडळ यांनी 8 मार्च रोजी महिला दिन असल्यामुळे उन्नती महिला मंडळ तर्फे समाजातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार व सन्मान केला पाहिजे तसेच विविध स्पर्धा ठेवून महिलांनाही प्राधान्य द्यायला पाहिजे याकरिता हा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी 9 मार्च रोजी रेणुकामाता मंदिर भडगाव रोड येथे कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ महिलांचा सत्कार व सन्मान केला तसेच विविध स्पर्धेच्या कार्यक्रमात सुरुवातीला महिला दिनानिमित्त “बाई पण भारी देवा” या गाण्यावर सौ मृणाली येवले व राजेश्वरी सिनकर यांनी खूप छान डान्स करून कार्यक्रमाची शान वाढवली तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध महिलांनी भाग घेतला या स्पर्धेमध्ये चीफ गेस्ट म्हणून रूपालीताई शेंडे होत्या या स्पर्धेमध्ये जिंकलेले सौ.प्रतिभा शेंडे, सौ सोनाली येवले, सौ रूपाली अमृतकर सौ वैशाली सोनजे, सौ वैशाली चिंचोले या सर्वांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक रूपाली दूसे ह्या होत्या  तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ महिला सौ सुलोचनाताई सुभाष सिनकर,सौ उषाताई गणपत वाणी या उपस्थित होत्या. तसेच या सर्व नियोजन उन्नती महिला मंडळ अध्यक्ष सौ संगीता येवले,सौ सविता चिंचोले,सौ भारती येवले,सौ मनीषा येवले,सौ उज्वला तरटकर,सौ मीना शेंडे,सौ सुनिता येवले,सौ संध्या ताई ब्राह्मण कर,आशा कोतकर सौ सुनीता महालपुरे,सौ चारुशीला येवले ,सौ. विद्या कोतकर,सौ अनघा येवले, राधिका येवले या सर्व महिला मंडळ सदस्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध व उत्कृष्ट केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनघा येवले व आभार सविता चिंचोले यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!