शिबीरात ११० महिलांनी घेतला मोफत रक्त तपासणीचा लाभ.
पाचोरा-
तालुक्यातील वाडी येथे पाचोरा वृंदावन फाउंडेशन, राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, पिंपळगाव (हरे.)ग्रामपंचायत – वाडी महाराष्ट्र शासन महाल्याब – यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:२९/०९/२०२३ शुक्रवार रोजी सकाळी ०९:०० वाजे पासून शिबिर नोंदणी करण्यात आली.
यात वेगवेगळ्या सहा प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या.साधारण या रक्त तपासण्या करण्यासाठी ३ते ४ हजार रुपये खर्च येतो. या शिबिराच्या माध्यमातून ११० महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आल्या. शिबीराच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. निळकंठ पाटील (अस्थीरोग तज्ञ ) समाधान देवरे (उप सरपंच)प्रकाश पाटील (मजदूर फेडरेशन सभापती) सोपान ठोंबरे (माजी सरपंच )समाधान पाटील (महाल्याब – टेक्निशियन) प्रतिभा परदेशीं सचिन सोनवणे (लॅब टेक्निशियन ) – आदी तसेच भारतीय सैन्यात नुकतेच भरती झालेल्या जवान ऋषिकेश पाटील (BSF) संदिप सकटे (Army) विजय देवरे (army) पवन पाटील (Army) यांचा ही सत्कार यावेळी करण्यात आला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसंघ, गणेश मंडळ यांनी प्रयत्न केले.