Blog

पाचोऱ्यात गोविंदा ची मृत्यूशी झुंज देत अखेर प्राणज्योत मालवली; काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आर्थिक मदतीची मागणी.

पाचोरा-

पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत ३५ वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला. मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली, शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत गोविंदा च्या परीवाराला आर्थिक मदतीची काँग्रेस चा वतीने मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेस तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आर्थिक मदतीची मागणी

शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडी चे नियोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा युवक दहीहंडी फोडतांना खाली पडला त्यास हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता औषध उपचार सुरू असतांनाच आज दिनांक २८ऑगस्ट २०२४ बुधवार रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर प्राण ज्योत मालवली. स्व. नितीन च्या जाण्याने शहरात शोककळा पसरली घटनेचे वृत्त कळताच काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परीवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले.शहरात या घटनेचे वृत्त समजताच शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात नितीन चौधरी चे अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन हा रिक्षा चालक होता घरातील कर्ता पुरुष होता.हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पच्छात आई वडील दोन भाऊ आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!