जळगाव जिल्हा

आखतवाडे येथील अंगणवाडीच्या बालकांना नित्कृष्ट आहार…

पाचोरा-

नगरदेवळा येथून जवळच असलेल्या आखतवाडे ता.पाचोरा येथील शासनातर्फे बालकांसाठी अंगणवाडी येथे येणारा THR आहार हा बंद पॅकेटमध्ये असून आहारात खूप उग्रवास येत असल्याने लहान बालकांना खाण्या लायक नसल्याचे पालकांनी सदरील आहार या पुढे घेणार नाहीत अशी तक्रार अंगणवाडी सह ग्रामपंचायतीकडे केली असता ग्रामपंचायत मार्फत तत्काळ अंगणवाडीतील बालकाची पालकाची मीटिंग बोलवण्यात आली त्यात अंगणवाडी मध्ये येणारा बंद पाकिटातून तांदूळ व अन्य मिक्स असलेला मालाचा अत्यंत उग्र वास येत असल्याचा व सुगडी सुद्धा अत्यंत नित्कृष्ट दर्जाची असून गुर ढोर देखील खाणार नाही असा आहार बालक कसे खाणार अश्या प्रतिक्रीया पालकांच्या उमटल्या. 

सदरील आहार या पुढे आम्ही कोणीच घेणार नाहीत पूर्वी जो आहार येत होता तोच शासनाने नियमित पाठवावा शासनाने या गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय करून आधी येणारा आहारच द्यावा अशी मागणी पालकांनी केली.

प्रतिक्रिया

आखतवाडे गावात एकूण तीन अंगणवाड्या असून त्यातील बालकाच्या पालकांनी सदरील अंगणवाडीत येणारा THR बंद पाकिटातून येणारा आहार याचा अगदी उग्रवास येत असल्याचे सांगितले असता आम्ही तात्काळ तिन्ही अंगणवाडीत जाऊन सदरील आहार बघितला व पालकसभा घेतली सदरील पाकिटे पालकांसमोर फोडून बघितले असता पालकांनी सदरील आहार हा बालकांना खाण्यासारखा नाही व त्याचा अत्यंत उग्रवास येत असल्याचा सांगितले व या पुढे हा आहार घेणार नाही  व शासनाने पुर्वीचाच आहार द्यावा अन्यथा आम्ही हा आहार घेणार नाहीत असे सांगितले.

दिपक गढरी उपसरपंच आखतवाडे

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!