जळगाव जिल्हा

पाचोरा येथे हमीभाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन.


पाचोरा-

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व सीसीआय दिल्ली तर्फे पाचोरा येथील श्री गजानन जिनींग आणि प्रेसींग फॅक्टरी येथे आज दि. 1 डिसेंबर शुक्रवार रोजी हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे सभापती श्री गणेश भिमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यनिमित्ताने सभापती श्री गणेश भिमराव पाटील तसेच जिनींग चे संचालक प्रमोद सोनार यांच्या हस्ते सर्वप्रथम काटा पुजन व पिक अप ने कापूस आणणारे पहिले शेतकरी आरेफावी हसन खाटीक, गोंदेगाव, यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकीय हमीभाव 7020 प्रमाणे कापसाला भाव देण्यात आलेला आहे.

श्री गजानन जिनींग आणि प्रेसींग फॅक्टरीची जुनी कालबाहय यंत्रसामुग्री बदलून नुकतेच अत्याधुनिक व स्वयंचलित जिनींग आणि प्रेसींग युनिट बसविण्यात आले आहे.

श्री गजानन जिनींग आणि प्रेसींग फॅक्टरी येथील हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटनप्रसंगी सभापती श्री बापुसो गणेश भिमराव पाटील, सीसीआय केंद्र अधिकारी योगेश थाळनेरकर, जिनींग चे संचालक प्रमोद सोनार, श्री गजानन उद्योग समुहाचे संचालक राजाराम नागो सोनार, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे संचालक श्री विजय कडु पाटील श्री युसुफ पटेल, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे कनिष्ठ लिपीक श्री आर व्ही पाटील, श्री व्हि सी पाटील, श्री एन एस पवार, श्री ए एस पाटील, श्री गजानन जिनींग आणि प्रेसींग फॅक्टरीचे कर्मचारी गोपाल शर्मा, कुंदन गायकवाड, अनिल पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन सीसीआय ची नवीन कापूस खरेदी प्रणाली समजून घेत होते. तसेच ह्या कापूस हंगामातील कापसाचे पेमेंट नवीन खरेदी प्रसंगी शेतकरी आधारकार्ड वर लिंक असलेल्या बँक खात्यावर तात्काळ पेमेंट होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँक पासबुक ऐवजी फक्त आधारवरच पेमेंट होऊन रक्कम मिळण्यास सोपे होणार आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!