कासोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता ; हजारो भाविक भक्तांची उपस्थिती.
कासोदा ता.एरंडोल
कासोदा येथे दि.११ सप्टेंबर बुधवार रोजी प.पू.श्री सद्गुरू गोविंद महाराज यांच्या नावाने सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि.१८ सप्टेंबर बुधवार रोजी करण्यात आली.
येथील महादेव मंदिरात सप्ताह सांगताच्या दिवशी पाच जोडप्यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने विष्णूनारायानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या बाबत सविस्तर वृत्त अशी की,महाराष्ट्रातील नंबर दोन तर जिल्ह्यातील सर्वात मोठा गेल्या ७१ वर्षांपासून असलेला अखंड हरीनाम सप्ताहाची दि.१८ सप्टेंबर बुधवार रोजी सांगता करण्यात आली. सकाळी ६ वाजता भव्य अशी काकडा आरती करण्यातआली.डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा सोहळा होता.
आरतीला हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री शिवसेना नेते ना.गुलाबराव पाटील , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील , शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील , मा.पालकमंत्री सतिष पाटील, डॉ.संभाजीराजे , जिल्हा प्रमुख शिवसेना (उ.बा.ठा.) डॉ.हर्षलमाने , मा.जि.प.सदस्य नाना महाजन , मा.जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले , सरपंच बंटी चौधरी , मा. लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील ( छावा ) आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी प्रेममुर्ती श्री ह.भ.प.विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे ८:३० ते १०:३० वाजे दरम्यान काल्याचे किर्तन झाले.त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कासोदा व परिसरातील तसेच पाहुणे मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर मुलींनी ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत ठेका धरला.
तसेच संध्याकाळी ६ वाजता गावातील मंडळांनी लावलेली वाजंत्री ढोल ताशे आपआपल्या जागेवरून वाजत गाजत येथील महादेव मंदिर परीसरात येऊन नंबर प्रमाणे आपआपले स्थान ग्रहण केले.
त्यात सियाराम मित्र मंडळ, शिवराय मित्र मंडळ , कुस्तीगीर महासंघ बजरंग गृप, शिवनेरी मित्र मंडळ , बजरंग गृप युवा मंच , विरसावरकर , शिवसाधना मित्र मंडळ ( गोल्डन बॉईज ) , त्रिमुर्ती मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ , सम्राट मित्र मंडळ , शिवगर्जना मित्र मंडळ आदींनी सहभाग घेतला.
तसेच भोई गल्लीतील त्रिमुर्ती मित्र मंडळाकडून श्री हनुमान, श्री महादेव , भालू , जटायू अश्या वेशभूषा करत पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
हिंदू मुस्लिम एकतेचे घडते दर्शन…
येथे गेल्या ७१ वर्षांपासून सप्ताह मिरवणुक तीनही मशीद जवळून जात असते , त्यावेळी मुस्लिम पंच कमिटीकडून पालखीचा मान राखून पालखीला श्रीफळ देऊन कार्यक्रमात शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करतात. याच्यातून येथील हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश सर्व दूर जात असतो.
येथुन सुतार गल्ली, दाभाडे गगल्ली , गढी भाग शेलार गल्ली, वाघ वाडा, काकासट चौक ठाकरे गल्ली, बिर्ला चौक, पांडे गल्ली, सादिकशाह बाबा दर्गा , मार्गे सकाळी ७ वाजता महादेव मंदिर येथे सांगता करण्यात आली.
रात्री शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून आदेशाचे पालन करत रात्री १२ च्या ठोक्याला दाभाडे गल्ली परीसरात वाजंत्री बंद करण्यात आली.
तेथून पुढे संपूर्ण रात्रभर पालखी पारंपारिक वाद्य सनई , सांभळ वाजून भजने गात हरीनाम सप्ताह हिंदू पंच मंडळ कमिटी व पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाली. मिरवणूक व पालखी दर्शनासाठी रात्रभर हजारो भक्तांचा जनसागर उसळला होता.
यावेळी कासोदा पोलीस स्टेशनचे स. पो. नी. निलेश राजपूत , पि.एस.आय. दत्तु खुळे, अमोल गुंजाळ, स.फौ. सहदेव घुले , पो. कॉ.नितीन सुर्यवंशी, योगेश पाटील , लहू हटकर , समाधान तोंडे , स्वप्नील परदेशी , कुणाल पाटील , स्थानिक गुन्हे शाखा जळगाव ( LCB ) पो.ना.भगवान पाटील , नंदू पाटील तसेच दंगा नियंत्रक पथक जिल्हा मुख्यालय , होमगार्ड , परिसरातील पोलीस पाटील आदींसह तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोबत महावीजवितरण मंडळाचे इ. राहुल पाटील कर्मचारी वृंद , पत्रकार बांधव , सर्व पक्षीय राजकीय नेते उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगांव भाग एस.डी.पी.ओ.अभयसिंह देशमुख व स.पो.नि.निलेश राजपूत स्व:त शेवटपर्यंत मिरवणुक शांततेत पार पडावी म्हणुन रात्रभर गस्त ठेऊन होते.
मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर हरीनाम सप्ताह हिंदू पंच मंडळ कमिटी वर्ष २०२४/२५ चे अध्यक्ष पै.सोनु नारायण शेलार युवासेना शहर प्रमुख , उपाध्यक्ष अशोक घोडके , वाल्मीक ठाकरे , सचिव रवींद्र मोरे , संतोष चौधरी , खजिनदार गोपाल पांडे व सर्व सदस्य यांच्याकडून कासोदा पोलीस स्टेशन व कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे शब्द सुमनांनी धन्यवाद व्यक्त करून आभार मानण्यात आले.