जळगाव जिल्हा

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलिस कर्मचारी निलंबित; निष्काळजीपणा,कर्तृत्वात कसूर केल्याचा ठपका..

जळगाव-

अमळनेर व जामेनरहून गुरे चोरट्यांना पकडून आणतांना पोलिसांच्या ताब्यातून दोन संशयित आरोपी बेड्यांसह पळून गेले.या प्रकरणी कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोहेकॉ. संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील आणि राहुल कोळी यांचा समावेश आहे. त्यांचे निलंबनाचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली.अमळनेर व जामनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या चार जणांना अमळनेर येथे नेत असताना बुधवारी (२२ ऑक्टोबर) रात्री अमळनेरनजीकच्या अंडरपासजवळ वाहनाचा वेग कमी झाल्याने शाकीर शाह अरमान शाह (३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) व अमजद शेख फकीर कुरेशी (३५, रा. मेहरूण परिसर, जळगाव) हे दोघे जण हातातील बेड्यांसह पसार झाले होते. या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जळगाव शहरातून पकडण्यात आले होते. दोघे बेड्यांसह अंधाराचा फायदा घेत पसार झाले.या प्रकरणी निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकारामुळे जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना केवळ निष्काळजीपणाची नाही तर स्थानिक गुन्हे शाखा (LCB)च्या सुरक्षा व्यवस्थेला थेट धक्का आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!