भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गायकवाड यांना चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर..
चोपडा-
वंचित बहुजन आघाडी चे सहकारी पक्ष ज्यांच्या सोबत युती झालेली आहे असे भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गायकवाड यांना चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुनील गायकवाड हे आदिवासी एकता परीक्षेचे राज्यसचिव असून गेल्या वीस वर्षापासून आदिवासी एकता परिषद मार्फत आदिवासींसाठी काम करीत आहेत त्यांच्या कामाला आज रोजी मा. प्रकाशजी आंबेडकर यांनी न्याय दिला आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये चोपडा विधानसभेत मार्फत मा. प्रकाशजी आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद मध्ये सुनील गायकवाड यांचे विधानसभेसाठी नाव जाहीर केले तसेच येणाऱ्या 30 सप्टेंबर रोजी आदिवासी नेते आणि भारत आदिवासी पार्टीचे विद्यमान खासदार राजकुमार राऊत आणि प्रकाशजी आंबेडकर यांची मोठी जनसभा चोपडा येथे नगरपालिका स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली आहे हे संपूर्ण आयोजन सुनील गायकवाड यांनी केलेले आहे त्यांची चोपडा विधानसभा मतदारसंघात जोरात तयारी चालू आहे कारण चोपडा विधानसभा मतदारसंघ हा एसटी राखीव असून पहिल्यांदाच कुणी भिल्ल समाजाच्या व्यक्ती आमदारकी लढणार आहे असा समाज की जो खूप गरीब म्हणून गणला जातो अशा समाजातून आजपर्यंत कोणीही आमदारकीसाठी लढलेले नाही इतिहासात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामधून भिल्ल समाजातून आमदारकीसाठी सुनील भाऊ गायकवाड यांनी तयार केली आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत चोपडा मतदारसंघात तिरंगी लढत होईल याचे चित्र स्पष्ट झाले आहे.