जळगाव जिल्हा

जळगांव पोलीस अधीक्षक यांनी केला ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


जळगांव-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च -२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल दिनांक २७ मे २०२४ सोमवार रोजी घोषित करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री. महेश्वर रेड्डी यांचे संकल्पनेतुन जळगांव जिल्हा पोलीस दलात प्रथमच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या ज्या पाल्यांना ८०% च्या वर गुण मिळवुन विशेष प्राविण्यासह उर्तीण होवून यश संपादन केले आहे.

अश्या पाल्यांचा दिनांक २९ मे २०२४ बुधवार रोजी सांयकाळी ५:०० वाजता पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे मा. पोलीस अधीक्षक साो. डॉ. महेश्वर रेड्डी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, श्री. प्रमोद पवार, पोलीस उप अधीक्षक गृह, यांचे हस्ते एकुण ४२ पाल्यांना प्रशंसापत्र व बक्षिस देवून गौरवण्यात आले. त्यात विशेषतः हा कु. सुष्टी ज्ञानेश्वर बागूल हिने ९८.४०% ने उत्तीर्ण होवून जळगांव शहरात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सदर कार्यक्रमावेळी पो.नि. दिपक बुधवंत, मानव संसाधन विभाग व रापोनि संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आयोजन पोउनि श्रीमती रेश्मा अवतारे, मानव संसाधन विभाग यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!