अपक्ष उमेदवार डॉ. नीलकंठ पाटील यांना व्यापाऱ्यांचा उदंड
प्रतिसाद;विजयाचा दिला विश्वास.
पाचोरा-
डॉ.नीलकंठ पाटील यांनी विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.डॉ नीलकंठ पाटील यांनी पाचोरा शहरातील गांधी चौक,विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, भाजी मार्केट इत्यादी महत्वपूर्ण भागात आपल्या प्रचार दौऱ्याचे नियोजन केले होते.
यावेळी त्यांनी शहरातील सोन्याचे व्यापारी वर्गाच्या प्रत्यक्ष भेट घेत आहेत या भेटीदरम्यान डॉ नीलकंठ पाटील यांना व्यापाऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व बाजार पेठेत डॉ नीलकंठ पाटील हे व्यापाऱ्यांच्या भेटी घेत आहेत,व्यापारी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत डॉ नीलकंठ पाटील यांनी दि.४ ऑक्टोबर माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून अधिकृत चिन्ह बॅट मिळाल्यानंतर प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचे आवडीचे चिन्ह बॅट मिळाल्याने या विधानसभेत मी षटकार मारणार असल्याचे डॉ. नीळकंठ पाटील यांनी सांगितले आहे.