जळगाव जिल्हा

हर्षिकाने केल वडिलांच स्वप्न पूर्ण; डॉ.निळकंठ पाटील यांच्या सह शिक्षकांनी केला सत्कार.

पाचोरा-

जि.प.प्राथमिक शाळा मोंढाळे ता. पाचोरा जि. जळगाव येथील शाळेतील शिक्षक कै.जितेंद्र पवार सरांची सुकन्या कु.हर्षिका हिचा MBBS साठी पुणे येथे निवड झाल्या बद्दल स्वर्गवासी वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्या बद्दल कु.हर्षिका व आई मीना पवार यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ व जिलेबीचे वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी कु.हर्षिकाला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात व शाळेकडून तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम स्थळी श्री.धनराज सर, वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्री.निळकंठ पाटील, श्री.ज्ञानेश्वर आखाडे, श्री.रविंद पाटील, श्री.संदीप जाधव, श्री.पंडीत गायकवाड (उपसरपंच), श्री.संदिप मानकर, श्री.नवीन पाटील (पो.पा.) श्री.एकनाथ सोनवणे (शा.व्य.स. सदस्य) श्री.दिनेश पाटील यांच्या सह आदी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!