क्राईमजळगाव जिल्हा

कजगाव!सहा महिन्याच्या बालकाच्या गळ्यास तलवार लावत साडे सहा लाखाची लूट,दरोडेखोऱ्यांनी वयोवृद्धासह महिलांना केली मारहाण

भडगाव-

भडगाव ता.कजगाव येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने चांदी सह रोकड अंदाजे साडे सहा लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे. चव्हाण व देशमुख कुटूंबास दरोडेखोरांनी मारहाण करत चार ते पाच जणांना जखमी करत दहशत निर्माण केली ६ महिन्याच्या बालकाच्या गळ्यास तलवार लावत चव्हाण यांच्याकडील ऐवज लांबवला सात ते आठ दरोडेखोरांनी चांगलीच दहशत केल्याने नागरीकांना मध्ये घबराटी वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस मोठया संख्येने दाखल झाले असुन शाम नामक श्वान पथक देखील दाखल झाले होते.

कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडत दरोडेखोरांनी आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले व अंगावरील सोने तलवार लोखंडी रॉड चा धाक दाखवत व मारहाण करत काढण्यास भाग पाडले साडेसात तोळे ,सोने, व १ लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेत तेथुन काहि अंतरावर असलेल्या बापु खोमणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू असतांनाच बापु खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आल्याने ते जागे झाल्याने दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला तेथुन काहि अंतरावर असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला या ठिकाणी बाहेरच झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला एका रूम मध्ये ताराबाई ओंकार चव्हाण या झोपलेल्या होत्या दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवारीचा धाक दाखवून अंगावरील चांदीचे कडे (गोट)एक किलो वजनाचे तसेच अंगावरील सोन्याची पोत कानातले असं अडीच तोळे सोने तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोने सह ८५ हजार रुपये रोख रक्कम असा चार ते पाच लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी चक्क कानाला जबर दुखापत करत नेली

तर समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला सोन चांदी देण्यास प्रतिकार करत असल्याने दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण वय ६८ यांना दोघ पायावर मोठ्या प्रमाणावर तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हाथावर मोठी दुखापत केली तर समाधान चव्हाण यास देखील जबर मारहाण दरोडेखोरांनी केली सदर घटने बाबत गावात फोन केल्या नंतर काहि तरुण काहि मिनिटांतच घटनास्थळी पोहचले मात्र दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला घटनास्थळी

सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अभयसिंग देशमुख,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील फौजदार डोमाळे,पालकर,गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील कजगाव पोलीस चौकी चे नरेंद्र विसपुते सह भडगाव पोलीस स्टेशन चे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते
घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते श्वान ने देशमुख यांचे घरापासून तर थेट चव्हाण यांच्या घरापर्यंत माग दाखविला पुढे चव्हाण यांचे घरापासून बाजुलाच असलेल्या शेतापर्यंत माग दाखविला व तेथेच तो घुटमळला.
ताराबाई चव्हाण यांच्या हाथातील चांदीच एक कडा निघत नसल्याने बुड्डी का हाथ तोड डालो असं करत दहशत निर्माण करत होते
गावात प्रचंड घबराट
एकाच रात्रीत दोन ठीकाणी दरोडेखोरांनी दरोडे टाकत मारहाण करत दहशत निर्माण केली एक घर फोडण्याचा प्रयत्न घर मालक जागे झाल्याने फसला या घटनेमुळे गावात ग्रामस्था मध्ये घबराट पसरली आहे.
कजगाव येथे पोलीस मदत केंद्र देण्यात आले आहे मात्र ते नावालाच आहे येथे कायमस्वरूपी पोलिसच नसल्याने गुन्हेगार प्रवृत्ती डोकेवर काढत आहे वास्तविक तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या या गावात सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे या गंभीर बाबीची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन येथे कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी व्यापारी मंडळ व ग्रामस्था कडुन होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!