जळगाव जिल्हा

नवीन कायदे विषयी जनजागृती व मार्गदर्शन शिबिर संपन्न;
सरकारी अभियोक्ता रवी पाटील यांनी दिले नवीन कायदे विषयी धडे..

पाचोरा-

पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे नवीन फौजदारी कायदेविषयी जनजागृती व मार्गदर्शन पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन फौजदारी कायदे विषयी जनजागृती व मार्गदर्शन शिबिर ५ मार्च रोजी पाचोरा शहरातील स्व.आर.ओ. तात्या पाटील व्यापारी संकुलात घेण्यात आले. या जनजागृती व मार्गदर्शन शिबिरात पनवेल येथील सरकारी वकील रवी पाटील यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे पी. एस. आय. शितल परदेशी यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी पोलीस पाटील उपस्थित होते.

भारत सरकारने नुकताच नवीन कायदा विषयी जनसामान्य व पोलीस खात्याला तसेच पोलीस पाटील यांना या नवीन कायद्याची माहिती असावी यासाठी पनवेल येथील सरकारी वकील रवी पाटील यांनी पाचोरा येथील नवीन व्यापारी संकुलात मार्गदर्शन करतांना सांगितले की, दिवाणी कायदे फौजदारी कायदे न्यायालया संदर्भात तसेच पोलीस स्टेशन संदर्भात नवीन आलेल्या कायद्याच्या संदर्भात माहिती व मार्गदर्शन दिले. कायद्याचे सर्वांनी तंतोतंत पालन केले पाहिजे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे त्यामध्ये कोणी मोठा कोणी छोटा असा कुठलाही भेदभाव नसून कायद्याचे योग्य वापर केला तर फायदा सुद्धा चांगला आहे. त्यामुळे कायद्याचे कुणीही उल्लंघन न करता कायदा पाळला तर सर्वांसाठी योग्य न्याय मिळतो. यावेळी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांनी देखील उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!