जळगाव जिल्हा

पाचोरा आगरातुन चाळीसगांव शिवपुराण कथेसाठी जादा बसेस सुरू.


पाचोरा-

दिनांक १६ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत चाळीसगांव येथे खासदार उन्मेष पाटील यांनी अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा चे औचित्य साधून चाळीसगांव येथील मालेगाव रोड येथे पंडित प्रदिपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन ४०० एकर जागेवर आयोजन करण्यात आले आहे.

सदरची कथा श्रवण करण्यासाठी महाराष्ट्र सह इतर राज्यातील महिला पुरुष येत असतात.

१६ जानेवारी रोजी कथेचा पहिला दिवस असल्याने पाचोरा आगर मधुन कथेस जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेसचा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या बाबत आमच्या प्रतिनिधींनी आगर प्रमुख प्रकाश पाटील यांचे सोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि,१६ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत पाचोरा आगरातुन बसेसचा जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.प्रवाशी भाविकांची संख्या लक्षात घेवून बसेस सोडण्यात येतील,प्रवाशी भाविकांना जास्तीत जास्त फायदा घ्यावे असे आवाहन हि यावेळी त्यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!