जळगाव जिल्हाशैक्षणिक

इतिहास परिषदेतून मिळणार स्थानिक इतिहासाला उजाळा;
पाचोरा महाविद्यालयात 4 जानेवारी रोजी आयोजन

पाचोरा-

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान , शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने व पीटीसी संस्थेच्या एम एम महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 4 जानेवारी 2025 रोजी आयोजित  एक दिवशीय राज्यस्तरीय इतिहास परिषदेत स्थानिक इतिहासाला उजाळा मिळणार असून या परिषदेत सुमारे 100 शब्द निबंध सादर केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एम एम महाविद्यालयात येथे 4 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय इतिहास परिषदेत संदर्भात माहिती देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य दालनात पत्रकार परिषद संपन्न झाली. संस्थेचे उपाध्यक्ष व्ही टी जोशी , उपप्राचार्य डॉ वासुदेव वले , परिषदेचे समन्वयक डॉ जे डी गोपाळ , डॉ माणिक पाटील , नितीन पाटील , ऋषिकेश ठाकूर उपस्थित होते.”स्थानिक इतिहास पुनर्लेखन आणि संशोधन” या विषयावर परिषद चार सत्रात परिषद होत असून स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंचे सखोल पुनर्लेखन व त्यावरील संशोधनास चालना देणे आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना स्थानिक पातळीवर इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक स्रोत व पद्धती यावर मार्गदर्शन करणे, तसेच विविध विद्वानांनी त्यांच्या संशोधनातून स्थानिक इतिहासाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवून देणे हा परिषदेचे मुख्य हेतू आहेत.परिषदेला राज्यातील इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगुन  4 जानेवारी रोजी सकाळी ०९:००परिषदेचे उद्घाटन व बीजभाषण डॉ. सोमनाथ रोडे ( लातूर ) यांच्या हस्ते होणार असून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ , संजय वाघ, व्ही. टी. जोशी, अॅड. महेश देशमुख,  दगाजी  वाघ, भागचंद  राका, दुष्यंत रावल, डॉ. पितांबर पाटील, सुरेश देवरे, डॉ. जयंतराव  पाटील, संजय कुमावत, पाटील, सतीष चौंधरी, खलील  देशमुख , प्रा. एस. झेड. तोतला उपस्थित राहणार आहेत.द्वितीय सत्रात  प्राचार्य डॉ. जी. बी. शहा, प्राचार्य डॉ. वसंत  देसले मार्गदर्शन करणार असून शोधनिबंधांचे वाचन होईल. तृतीय सत्रात  डॉ. प्रशांत देशमुख , प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील हे प्रमुख वक्ते असतील. या सत्रात इतिहास पुनर्लेखनासाठी आवश्यक साधने, ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन आणि संशोधन प्रक्रियेतील आव्हाने यावर चर्चा होईल.समारोपाच्या चौथ्या सत्रात प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील,  व्ही. टी. जोशी, प्रा. एस. झेड. तोतला मार्गदर्शन करणार आहेत.परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन  डॉ जे डी गोपाळ ,डॉ. माणिक पाटील  यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!