जळगाव जिल्हा

महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या कु. पुजा पाटीलचा माँ से बेटी सवाई या उपक्रमाअंतर्गत लिनेस क्लब ऑफ पाचोरा तर्फे गौरव.

पाचोरा-

कु.पुजा पाटील पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी असून श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाची विद्यार्थिनी आहे. अत्यंत सामान्य व कष्टकरी कुटुंबात वाढलेल्या पूजाचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही पूजाने परिस्थितीपुढे कधीच हार मानली नाही. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मनाशी बाळगत तिने जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम यांच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वी निवड मिळवली विशेष म्हणजे ती गावातील पहिली महिला पोलिस ठरली.तिचा हा संघर्ष आणि यश आज अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ अनुजा देशमुख, लिनेस क्लबच्या सचिव सौ. सरलाताई पाटील, ज्येष्ठ संचालिका सौ. उज्वलाजी चोरडिया, सौ. पिंकीजी जुनोदिया, सौ पुजाजी देसाई, कु.चेतना हिरे आदी उपस्थित होत्या. यावेळी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाजातील प्रत्येक मुलीने शिक्षण, आत्मविश्वास, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आपल्या स्वप्नांना यशाची किनार द्यावी, असा प्रेरणादायी संदेशही देण्यात आला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!