नाचणखेडा सरपंचपदी सौ.ज्योती कैलास पाटील यांची बिनविरोध निवड..

जामनेर –
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवड मध्ये सौ ज्योती कैलास पाटील यांची बिनविरोध झाली .या निवडीत उपस्थित व्ही . डी. बागडे ,अश्विनी बेंद्रे,ग्रामविकास अधिकारी अजय. बी. वंजारी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

सरपंच पदासाठी सौ ज्योती कैलास पाटील यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सहकारी यांना पण संधी मिळावी यासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे माजी सरपंच यांनी सांगितले.यावेळी पॅनल प्रमुख हर्षल भाऊ चौधरी,माजी उप सरपंच आबेद पटेल , उप सरपंच श्रीकांत चौधरी ग्राम पंचायत सदस्य, सौ सुनंदा महेंद्र पाटील,सुरेखा मोरे,अरुण पाटील , इकबाल देशमुख ,नितीन बाविस्कर,मच्छिंद्र पवार ,तसेच विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश चौधरी , व्हा चे. शाम पाटील, मा .चे .सुभाष चौधरी , रतन भोई ,धनंजय पाटील,केशव इंगळे,रामदास बाविस्कर , जिजाबाई चौधरी,गावातील ज्येष्ठ नागरिक आत्माराम राघो चौधरी,अशोक चौधरी , विद्याधर, रामदास चौधरी,भगवान रामा , हबीब पटेल ,प्रकाश मोरे,इकबाल पटेल,जिवन पटेल, कलीम पटेल, शफी मिस्त्री,सुरेश चौधरी,अरुण कुलकर्णी,अमृत पाटील, बाळू मेतकर सुनील सर ,समाधान पा,हिरालाल पाटील,सुपडू भगत,संतोष गोतमारे , ईश्वर गोतमारे, गजानन चौधरी, संजय चौधरी, तुषार बापू,पवन चौधरी,महेंद्र पाटील,जुनेद पटेल,भोला पाटील,अभिषेक पाटील,नाना इंगळे ,भिलखेडा ग्रा. प प्रदीप पाटील भिलखेडा,दिपक वनारसे,देवेंद्र चौधरी,प्रमोद पाटील, विलास पाटील तसेच गावातील ग्रामस्त,भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करत मा. सरपंच यांचे कौतुक केले व केलेल्या कामाच्या जोरावर तुमचे सर्व पॅनल पुन्हा भरघोस मतांनी विजयी होईल अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.