नाशिक विभागाचा ‘उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक’ पुरस्कार जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला..

जामनेर-
नाशिक विभागामार्फत दरवर्षी प्रदान केला जाणारा यंदाचा मानाचा ‘उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक’ पुरस्कार सन २०२४-२५ या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवनियुक्त आरोग्य निरीक्षक सोपान विठ्ठल राठोड यांनी त्यांच्या पहिल्याच वर्षात आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट नियोजनबद्ध व परिणामकारक कार्य करून हा सन्मान पटकावला आहे, ही जामनेर तालुक्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, कीटकजन्य आजार नियंत्रण, साथ रोग प्रतिबंध, जनजागृती मोहिमा, लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, मानव विकास कार्यक्रम, स्वच्छता आणि शासनाचे विशेष नवनवीन आरोग्य उपक्रम यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली साधलेली प्रगती उल्लेखनीय ठरली आहे.जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी यांनी राठोड यांच्या संपूर्ण दप्तराची तपासणी केली असता ती पूर्णपणे योग्य असल्याचे आढळले. यांनी प्रस्ताव सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, नाशिक विभाग, डॉ. विवेक खतगावकर यांच्याकडे सदर केला असता, डॉ. खतगावकर यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉ.कपिल आहेर व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा नाशिक डॉ.विवेक खतगावकर यांच्या हस्ते राठोड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी त्यांच्या कामाची व पुरस्काराची दखल घेत शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या यशाबद्दल अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि संपूर्ण आरोग्य विभागाकडून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
राठोड यांच्या यशात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी बु. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल देसले व डॉ. नरेश पाटील, डॉ कांचन गायकवाड तालुका आरोग्य सहाय्यक बशीर पिंजारी तालुका यातील सर्व आरोग्यातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.व नेरी येथील संपूर्ण वैद्यकीय स्टाफ यांचे मोलाचे व अनमोल सहकार्य राठोड यांना लाभलेले आहे.




