महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव सोहळा..

भडगांव-
तांदुळवाडी ता.भडगाव येथील कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिनी दि. ०६/०१/२०२६ मंगळवार सकाळी ठीक १०.०० वाजता सन्माननीय अध्यक्ष, राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष श्री. राकेश सुतार, यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील गोंडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप समारंभ आयोजित केलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी तांदुळवाडी ता. भडगाव येथे पत्रकारांच्या माध्यमातून अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना पाचोरा व भडगाव तालुक्यातील सन्मानित व्यक्तींच्या माध्यमातून शालेय किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात तालुका हल्लाकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार श्री .प्रल्हाद पवार , उत्तर विभागीय उपाध्यक्ष श्री. मनीष सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी, यांनी वारंवार प्रयत्न करून हा कार्यक्रम ग्रामीण भागातला दहा वर्षाच्या कालखंडात पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पाचोरा व भडगाव परिसरातील सन्मानित पत्रकारांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी.




