जळगाव जिल्हा

शिवजयंती निमित्त सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे अल्पोपहार वाटप; आमदार किशोर पाटील यांचीही उपस्थिती

पाचोरा-

पाचोरा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या पावन पर्वावर शहरातील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील यांच्या संकल्पनेतून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सकाळच्या सत्रातील शोभायात्रेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना व शालेय विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्यांच्यासोबत पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील मुख्य शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या हजारो शिवभक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल दरवर्षी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींचे स्वागत करून त्यांना अल्पोपहार देण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक पाटील (आबा पोलीस), डॉ. भरत पाटील, गोपाल लोखंडे, राहुल राठोड तसेच डॉ. ऋषिकेश ढाकरे, शुभम गव्हाले, अनिल हटकर, रमजान मन्सूरी, कार्तिष चांगरे, राहील खान, अमोल कोळी. व पूजा जगताप, वैशाली क्षिरसागर, नंदा गिरी यांनी सहभाग नोंदवला होता. सामाजिक बांधिलकी जपत शिवजयंती साजरी केल्याबद्दल शिवप्रेमींनी डॉ. स्वप्निल पाटील व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!