माजी जि.प.सदस्य पदम बापू पाटील ॲक्शन मोडमध्ये, शेतकरी कर्जमाफी गावनिहाय याद्या जाहीर करण्याबाबत दिले निवेदन

पाचोरा-
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, या मागणीसाठी मा. जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांचा वतीने प्रांताधिकारी, व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर २ लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये व पात्र लाभार्थ्यांना स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी गावनिहाय याद्या जाहीर करून त्या ग्रामपंचायत, चावडी, सोसायटी कार्यालय तसेच संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पारदर्शकतेसाठी या याद्या अधिकृत शासकीय संकेतस्थळावरही प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी निवेदनव्दारे करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र शासन व युती शासन तसेच कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले.

निवेदन देताना पदम बापू पाटील मा.जि.प.सदस्य कुरंगी बांबरुड गट ,शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भाऊ तावडे,विजय पोपट पाटील (चेअरमन, विकास सोसायटी वेरूळी) हेमराज ठाणसिंग पाटील (माजी सरपंच, मोहाडी)संतोष शिवाजी पाटील राजू नारायण चौधरी तसेच रोहित कैलास पाटील (माजी सरपंच आसनखेडा सुपुत्र) यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.



