चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतीचे नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न.
चाळीसगांव-
आज दिनांक
24ऑक्टोबर
मंगळवार रोजी
अशोका विजयादशमीचे
तसेच
धम्मचक्र
प्रवर्तन
दिनाचे
औचित्य साधून
या
नूतन
कार्यालयाचे
उद्घाटन
करण्यात
आले.
पंचायतीचे अध्यक्ष मा.साहेबरावजी घोडे माजी आमदार , तालुक्याचे धडाडीचे आमदार मंगेशदादा चव्हाण , माजी राजीव दादा देशमुख , चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन मा.नारायणभाऊ अग्रवाल , दै.ग्रामस्थ चे संपादक मा.किसनराव जोर्वेकर , चा. ए.सोसायटीचे सेक्रेटरी मा.डॉ.विनोद कोतकर यांचे हस्ते व शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
पंचायतीचे कार्याध्यक्ष आयु.गौतम झाल्टे,उपाध्यक्ष आयु. रामचंद्र जाधव , कोषाध्यक्ष आयु.महेश चव्हाण , संचालक आयु.गौतम जाधव,आयु. राहुल जाधव यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
संस्थेतर्फे सरचिटणीस धर्मभुषण बागुल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलतांना त्यांनी तालुक्यात 10 एकर जमिनीवर 10 कोटीचे भव्य असे बौद्धविहार उभारण्याची या संस्थेची योजना आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांना याबाबत ची योजना समजावून सांगितली व सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहन केले .
” समाज कार्यासाठी जमा केलेल्या रकमेतून 1 रुपया देखील स्वतःसाठी खर्च करणे यापेक्षा नीचपणा दुसरा कोणताही असू शकत नाही .”अतिशय प्रामाणिकपणे काम करून आपण सर्वांच्या मदतीने हे बौद्ध विहार उभारले जाणार आहे. तसेच या बौद्धविहारात तथागत बुद्धांचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महान मानवी कल्याणाचे तत्वज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. येथे आदर्श माणूस , आदर्श समाज आणि एकसंघ राष्ट्र घडविण्याचे कार्य केले जाईल.बौद्ध पंचायतीत तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मान्य असलेल्या कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला सामावून घेतले जाईल असे ही प्रतिपादन करतांना बागुल यांनी शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणा दायी स्मारक झाले पाहिजे यासाठी न. पा.प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली.*
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मा.घोडे सरांनी बौद्ध विहारासोबतच दीनबंधु आंबेडकर आश्रम या ऐतिहासिक संस्थेच्या विकासासाठी शासनस्तरावर चालविलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.ही संस्था देखील लवकरच उभी राहील असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.
कार्यालयाचे उद्घाटक आमदार मा.मंगेशदादा चव्हाण यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी मदत करण्यास संस्थेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रमुख अतिथी किसनराव जोर्वेकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी धम्मदान देणारे बांधव आयु.सुधाकर मोरे , आयु. कारभारी केदार ,आयु.रवी भालेराव , इंजि.रवी नागदिवे , इंजि.आदित्य फुले यांचा सत्कार पंचायत तर्फे करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व विश्व भुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन करण्यात आली.यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
व्यवस्थापक समिती सदस्य आयु.रवींद्र निकम यांनी सुरेख सूत्र संचालन केले,सौ.सोनाली ताई लोखंडे यांनी सर्वाँना त्रिशरण व पंचशील दिले.
महेंद्र जाधव, स्वप्नील जाधव , नितीन मरसाळे, बाबा पगारे , विष्णू जाधव ,ज्ञानेश्वर बागुल ,मनोज जाधव,निवृत्ती बागुल, बंटी जाधव , सागर निकम ,प्रदीप अहिरे, विश्वजित जगताप ,सुरेश पगारे , दीपक बागुल , राजू अहिरे,सौ. माया अहिरे ,गणेश बागुल , जितेंद्र महाले , नाना घोडेस्वार ,अवधेश बागुल , धनंजय अहिरे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
बाबा मंडप डेकोरेटर्स, नक्षत्र इव्हेंट यांनी विशेष सहकार्य केले.
बौद्धाचार्य भैय्यासाहेब ब्राम्हणे डॉ.वसंतराव मोरे , किसन आप्पा मोरे, डॉ.छायाताई निकम , रावसाहेब जगताप सर , आनंदा बागुल सर, प्रभाकर पारवे सर, बाजीराव गुजर , मिठाराम गुजर , संजय गुजर , मुकेश जाधव , ॲड.तुषार पाटील , प्रा.निलेश पाटील सर , भैय्या खरात , उत्तम वांमन निकम ,चिंतामण निकम ,सुरेश मोरे सर , वसंतराव मरसाळे,नानासाहेब सोनवणे सर (कर्जत), सी बी.मोरे सर ,पितांबर झाल्टे ,अरुणभाऊ निकम यांचे सह शेकडो समाज बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.