मुख्याध्यापक बेपत्ता;पत्नीची पाचोरा पोलीसात फिर्याद.
पाचोरा-
शहरातील भास्कर नगर येथील रहिवासी तथा विद्या प्रबोधनी शिक्षण संस्था वरखेडी येथील शाळेत कार्यरत मुख्याध्यापक हे शाळेच्या कामानिमित्त पुणे येथे जात असल्याचे सांगून गेले असता बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याबाबत पाचोरा पोलिसात पत्नीच्या फिर्याद मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा शहरातील भास्कर नगर येथील रहिवासी तथा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील विद्या प्रबोधणी शिक्षण संस्थेच्या शाळेत कार्यरत मुख्याध्यापक महेंद्र धर्मा तागड (वय-४०) हे दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ४:३० वाजेपुर्वी शाळेच्या कामानिमित्त पुणे येथे जात असल्याचे सांगून गेले असता अद्यापपावेतो घरी परत न आल्याने पत्नीच्या फिर्याद वरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता मुख्याध्यापक ची उंची ५ फूट ५ इंच असून रंग गोरा, अंगात क्रीम व्हाईट रंगाचा शर्ट, ब्लुरंगाची पॅन्ट, ब्लॅक कलरचे स्वेटर सोबत मफलर,शरीर बांधा मजबूत असून डोळे घारे, नाक सरळ,केस काळे, पायात चप्पल असे वर्णन असून हा सदरील वर्णनाचा बेपत्ता इसम आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशनच्या (०२५९६-२४०१३३)या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.विश्वास देशमुख करीत आहे.