जळगाव जिल्हा

अनिल देशमुख यांची शिवसेना-उबाठा
उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती

पाचोरा-

दिनांक ०२/१०/२०२४

पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील निष्ठावंत शिवसैनिक अनिल रामराम देशमुख यांची शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोहटार-खडकदेवळा जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या सारोळा बुद्रुक येथील अनिल रामराव देशमुख यांना वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उपतालुका प्रमुख म्हणून त्यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांना अनुसरून कामाला लागण्याचे नमूद करत ताईंनी त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीभाऊ पाटील, प्राध्यापक राजेश सोनवणे, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पाटील, सारोळा बुद्रुक येथील अनिरूध्द हवाले, नाना पाटील, सुभाष पाटील, प्रवीण हवाले, मंगेश सोनवणे, तारखेडा खुर्द येथील संदीप पाटील व किरण चव्हाण यांच्यासह  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!