प्रा. रवींद्र चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार.
पाचोरा-
महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई ) कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. रवींद्र चव्हाण यांना “महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सावंतवाडी कोकण येथे झालेल्या दिमाखदार समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रा. रवींद्र चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 13 वी राष्ट्रीय परिषद सावंतवाडी कोकण येथील नगरपालिका नाट्यगृहात दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झाली. या परिषदेतील विशेष सोहळ्यात प्रा. रवींद्र चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविंद्र चव्हाण हे मराठी व भूगोल विषयाचे अध्यापक असून कनिष्ठ महाविद्यालयीन सेवेत त्यांनी 24 वर्ष सेवा बजावली आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण व मुलींच्या शिक्षणात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रा.रवींद्र चव्हाण हे पाचोरा येथील माणिकराजे पवार ट्रस्ट आणि विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक असून पाचोरा येथील अ.भा. मराठा महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, जिल्हासचिव प्रवीण मोरे, गजेंद्र कानडे (दोंडाईचा) खडकदेवळा माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती कुंदा पाटील, उपशिक्षक चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, स्वप्निल बागुल, प्रा. डॉ. गिरीश पाटील (नाशिक), सतीश संदनशिव, जि.प. शिक्षिका स्वाती पाटील, कुमुदिनी पाटील, श्रद्धा अहिरराव, वैभवी पाटील , ज्योती संदानशिव आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते.