कानशिलात मारल्या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..
पाचोरा-
महिलेवर केलेल्या उपचाराबाबत विचारणा करत डॉक्टरांशी हुज्जत घालत डॉक्टराच्या उजव्या गालावर कानाजवळ जोरात चापट मारल्याचा प्रकार पाचोरा शहरात घडला आहे.
या बाबत संबंधीताने पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली आहे.
दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील सावनेरकर दवाखान्यात मुकुंद सावनेरकर यांचे कॅबिन मध्ये बसुन पेशंट चेक करत असतांना भागवत पाटील व इतर 07 अनओळखी इसम असे त्यांचे कॅबिन मध्ये गैरकायदा जमुन शिंदाड येथील महिलेच्या उपचाराबाबतची विचारणा करत त्यांचेशी वाद करुन डॉक्टर सावनेरकर यांचे उजव्या गालावर कानाजवळ जोरात चापट मारली म्हणुन डॉक्टर मुकुंद सावनेरकर यांनी सदर संशयित मारेकरी इसमासह इतर 7 जणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली त्यांचा फिर्यादीवरून भा.द.वी.कलम 143,146,149,341,323,352,504,506 व महाराष्ट्र मेडिकेअर सव्हीस ईन्स्टीट्यूशंन्स व्हाईलंन्स अॅन्ड डॅमेड अॅक्ट कलम 3,4, प्रमाणे पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.