जळगाव जिल्हा

आदिवासी बांधवांना शासकीय योजनेची माहिती लाभ देत मेळावा उत्साहात संपन्न.

पाचोरा-
तुळजाई जिनींग मोढाळे रोड पाचोरा येथे महसूल विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध विकास मार्गदर्शन शिबिर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यात विविध योजनांची माहिती व वैयक्तीक लाभाच्या योजना करीता पाचोरा भडगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आदिवासी विकास मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात विविध शासकीय योजना तसेच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, आदिवासी विभागाच्या विविध योजना तसेच आदिवासी बांधवांना आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विविध योजनांची यावेळी माहिती दिली तसेच प्रकल्प अधिकारी यांना माझ्या मतदारसंघातील एक ही बांधव वंचित राहू नये अश्या सूचना देण्यात आल्या व नवीन योजनांची प्रकरणे तसेच शासकीय प्रमाणपत्र दाखले यांचे जागेवर अर्ज स्वीकारण्यात आले तसेच बचत गटाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली त्या प्रसंगी आदिवासी विकास विभाग यावल येथील अधिकारी कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व विविध शासकीय योजना राबविल्या जातात त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील , भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जी. प. सदस्य मधु काटे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख भडगांव संजय पाटील , माजी जि. प. सदस्य व शिवसेना तालुका संघटक पदमसिंग पाटील , माजी जि.प.सदस्य जालिंदर चित्ते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील , भडगांव समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते युवराज पाटील , पाचोरा माजी नगराध्यक्ष संजय गोहिल ,भडगाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावरकर, भडगाव शिवसेना शहर प्रमुख आबा चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, युवा सेना तालुकाप्रमुख पाचोरा योगेश पाटील व तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच यांचे सह पाचोरा- भडगांव तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!