जळगाव जिल्हा

घरकुलासाठी जागा नावे लावण्यासाठी, सरपंचाने मागितली लाच,दोघांवर गुन्हा दाखल; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा-

घरकुलासाठी जागा नावावर करून देण्यासाठी सरपंचाने 10 हजार रुपयांची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक जळगाव विभाग यांनी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी म्हणून सरपंच अनिल विश्राम पाटील (वय 46) व खाजगी इसम बलराम हेमराज भिल (वय 46 वर्षे, दोन्ही रा.खडकदेवळा बु. ता. पाचोरा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 40 वर्षीय तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नव्हती. त्यांच्या नावावर गाव नमुना 8अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी 10 हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली.

शुक्रवारी दि.27 सप्टेंबर रोजी सायंकाळी खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!