पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसेना (उबाठा) शाखांचे शुभारंभ.
पाचोरा-
शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची अर्धांगिनी सावली प्रमाणे साथ देणारी आम्हा तमाम शिवसेनेची माऊली माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या
ममता दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका गाव तिथे शाखा याप्रमाणे शाखा उद्घाटन सोहळा शुभारंभ पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड जिल्हा पंचायत गटातील गावापासून करण्यात आला होता. दि. 08/01/2024 रोजी भोजे, चिंचपुरे, पिंप्री बु. प्र. पा., कोल्हे, अटलगव्हाण आदी ठिकाणी शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन सौ वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रमुख लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, संदीप जैन उपजिल्हा युवाधिकारी, शशी पाटील तालुका युवाअधिकारी, शहर युवा अधिकारी पाचोरा मनोज चौधरी, गफार भाई, अभिषेक खंडेलवाल, आणि समस्त तालुका पदाधिकारी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथ प्रमुख, शाखा संघटक, सोशल मीडिया प्रमुख, बी. एल. एजंट सह समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.