चाळीसगांव शहर पोलिसांची उत्तम कामगिरी गहाळ झालेले मोबाईल केले हस्तगत.
चाळीसगांव-
चाळीसगांव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील मागील व चालु वर्षी आजपावेतो बरेच मोबाईल गहाळ बाबत संबंधीत मोबाईल धारक यांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. सदर तक्रारीबाबत मा.डॉ. महेश्वर रेड्डी सो, पोलिस अधिक्षक जळगांव, मा. सौ. कविता नेरकर अप्पर पोलिस अधिक्षक चाळीसगांव, मा.श्री अभयसिंह देशमुख सहा. पोलिस अधिक्षक उपविभाग चाळीसगांव यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटींग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करणे बाबत दिलेल्या सुचनावरुन मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहीतीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे तांत्रिक विश्लेषण करीता मदत घेवुन चाळीसगांव शहर पोलिसांनी एकुण 12 मोबाईल अंदाजे किंमत 2,10,000/- किं. चे मोबाईल संच हस्तगत करुन ते मुळ मोबाईल धारकास आज दिनांक 25/05/2024 रोजी मा. सौ. कविता नेरकर अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव व मा.श्री अभयसिंह देशमुख सो, सहा. पोलिस अधिक्षक उपविभाग चाळीसगांव यांचे हस्ते परत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. डॉ. महेश्वर रेड्डी सो, पोलिस अधिक्षक जळगांव, मा. सौ. कविता नेरकर अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, मा.श्री अभयसिंह देशमुख सो, सहा. पोलिस अधिक्षक उपविभाग चाळीसगांव,
यांचे मार्गदर्शनावरुन चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनचे पोनि / श्री संदीप भटु पाटील, पोकों / 1422 शरद पाटील, पोकों/78 नरेंद्र चौधरी, पोकॉ/3264 मनोज तडवी, पोना/सचिन सोनवणे (सायबर पो.स्टे)पोना/ईश्वर पाटील (स्था. गु. शाखा), पोकों / गौरव पाटील (स्था. गु. शाखा) अश्यांनी केली आहे.