जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात गवतात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांची उत्तम कामगिरी,

पाचोरा-

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील उमिया मार्बल समोरील हिरव्या गवतात दिनांक २८ सप्टेंबर २०२३रोजी २वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या स्थळावरून मृतदेह ताब्यात घेत जागेची पाहणी करत पंचनामा केला होता.

त्यात त्यांना एक जिओ कंपनीचा मोबाईल आढळून आला होता, सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची दुर्गंधी परीसरात पसरलेली होती, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहावरून ओळख पटविण्यासाठी मोठी अडचण पोलिसांसमोर येत असतानाच जिओ कंपनीचा बंद अवस्थेत आढळून आलेला मोबाईल दुरुस्त करण्याचा निर्णय पाचोरा पोलिसांनी घेतला, तातडीने मोबाईल दुकानावरून मोबाईल रिपेअर करून त्याचा डिस्प्ले बसवून मोबाईल चालू करण्यात आला, त्यातील नंबरचा आधार घेत शोध घेतला असता सदर मृतदेह पाचोरा तालुक्यातील सार्वे प्र. बो.येथील विष्णू युवराज दुधे (वय ३१) याचा असल्याचे समोर आले आहे, सदर युवक हा सिल्लोड येथे ३ वर्षांपासून कामानिमित्त गेलेला होता तर त्याची पत्नी ही दोंडाईचा येथे राहत होती.

मात्र युवक पाचोरा येथे अशा अवस्थेत आढळून आल्याने युवकासोबत नेमके काय, कसे, केव्हा झाले हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. तर सदर युवकाच्या DNA मेडिकल रिपोर्ट साठी पुढील कारवाई केली जाणार असून त्याच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करून नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी संपन्न झाला आहे. पाचोरा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ सर्व बाबी समोर ठेवत कुजलेल्या अवस्थेत कधीही ओळख न पटू शकणारा मृतदेहाची ओळख काही तासातच पटविल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.यात उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक योगेश गणगे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेशक पथक प्रमुख पोलीस हवलदार मल्हार देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, प्रकाश शिवदे, योगेश पाटील, यांच्या पथकाने कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहावरून युवकाचा शोध घेतल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!