नवदुर्गेला भावपूर्ण निरोप;वैशालीताई सुर्यवंशींच्या हस्ते मंडळांचा सत्कार
भडगाव-
भडगाव येथे रविवारी रात्री उशीरापर्यंत नवदुर्गा मंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रविवार दुपारपासून भडगाव शहरात विसर्जन मिरवणूक सुरू झाली. याआधी ताईंनी शहरातील बहुतांश मंडळांना भेटी देऊन नवदुर्गेचे दर्शन घेतले. यानंतर विसर्जन मार्गावर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येथून जाणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा वैशालीताई सुर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, वैशालीताई सुर्यवंशी यांनी काही मंडळांच्या समोर वाजंत्रीच्या तालावर ठेका धरला तेव्हा उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले.
याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील, तालुका प्रमुख जे. के. पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, मनोहर चौधरी, योजना पाटील, जिभाऊ महाजन, चेतन पाटील, चेतन रंगनाथ पाटील, माधव राजपूत, पृथ्वीराज पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, यश बिरारी, सुनील महाजन, मनीषा पाटील, सुरेखा वाघ, पुष्पा परदेशी, सोनाली चौधरी, नवल राजपूत, सत्यजीत पाटील, उमेश पाटील, देवेन परदेशी, चेतन पाटील, रोनित अहिरे आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.