पाचोऱ्यात ऑनलाईन चक्री गेम वरती पोलीसांचा छापा, अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले.

पाचोरा-
पाचोऱ्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन चक्री सर्रासपणे सुरू आहे पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गस्त घालताना एका चक्रीवर छापा टाकला असता ४० हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले. चक्रीचालक घटनास्थळावरून फरार झाला. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या बाबत प्राप्त माहितीनुसार वृत्त पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे २३ मार्च रोजी रात्री पावणेआठला राजीव गांधी टॉउन हॉलमागे एक इसम हा दुकानात टेबलवर संगणकाच्या साहाय्याने एलईडी स्क्रीनवर १ ते १० अंक असलेल्या चक्रीवर पैसे लावत होता. या ठिकाणी पोलीस पथकाने अचानक छापा टाकला. तेव्हा नागरिकांनी पळ काढला. पोलिसांनी दुकानातील ४० हजार रुपये किमतीचे २ कंपनीचे स्मार्ट एलईडी टीव्ही व २ सीपीयू जप्त करण्यात आले आहेत.या घटनेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चक्रीचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, वाहनचालक पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर पाटील यांनी केली.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पाचोरा शहरात अवैधरित्या चालणाऱ्या चक्रीविरोधात मोहीम सुरू केल्याने चक्रीचालकांचे धाबे दणाणले आहे.




